शनिवार, २५ जुलै, २०१५

5. ती आई होती म्हणूनी..


 "ए ,  मला नाही हां ते टच-बीच कळत.. आणि मुळात गरजच काय मला नवीन phone ची ?"
"असं कसं आई , पन्नासावा वाढदिवस आहे.. आणि त्यात तुझा phone चा डब्बा झालाय "
"काही डब्बा नाही.. चांगला चालतोय. पडला तरी काही नाही होत त्याला "
"अग technology किती बदलली आई.. आजकाल कुणीतरी वापरत का ते बटण वाले phone ?"

आईनी नवीन phone वापरावा यासाठी माझे अथक प्रयत्न चालू, पण सगळं व्यर्थ. " बाबा असं चालत नाही अहो. तुम्ही तरी सांगा. बदलत्या technology सोबत आपण पण बदललं पाहिजे. तुम्ही तरी काही बोला तिला." तावातावानी मी बोलत होतो. जणू काही smartphone खपवण्याच target होतं माझ्यापुढे. गोल गोल बटण फिरवायच्या dial पासून ते touch screens पर्यंत कित्ती पुढे आली "आपली" technology. आणि आमच्या घरचे बघा. फार वाईट वाटत होतं मला. Engineer मुलगा आणि आईला साधा smartphone वापरता येत नाही म्हणजे काय? मी एकदम personally च घेतलं हे सगळं!!..  आणि शेवटी एकदाचा तो phone घरी आला. Full  accomplished झाल्यासारखा वाटत होतं मला. आपण कुणाच्या मागं राहायला नको.

जेंव्हा पहिल्यांदा mobiles आले तेंव्हाची गोष्टं. SMS कसा करायचा हे शिकवायला मला ३ महिने गेले. आणि त्यात पण प्रचंड गोंधळ,चीड चीड..
"आगं आई , असा message मिळाला की "milala" असा परत SMS करायचा नसतो . वाटेत कुठं गायब होत नाही तो SMS. आणि शिवाय तुला मिळाला हे मला आपोआप कळत असतं . त्यासाठी SMS कशाला वाया घालवायचा !!" मी म्हणजे अगदीच आगाऊ पणे आक्कल काढत होतो.

पण परवा मात्र shock झालो. WhatsApp ping आला.. कुठल्यातरी group वर timepass चालू असेल असं वाटून ignore केलं तर परत vibrate. फोन उघडून बघतो तर चक्क आईचा WhatsApp ping ..
"जेवण झाले का?"-आई

मग मात्र हसूच आलं.  Technology प्रमाणे बदललं पाहिजे हे खरच .. पण technology तरी काय काय बदलेल? आई ती आईच .. landline असो, email असो, WhatsApp ping असो नाईतर उद्या आणि काही..
"जेवण झाले का?"-आई

:)


ref :ती आई होती म्हणूनी.. (ती गेली तेंव्हा रिमझिम - कवी ग्रेस)



1 टिप्पणी: