"इकडं बघा . इकडं .. कुठं म्हणतीये मी? आहो .. बघा तर मी कुठ सांगतीये ते !!!!!! "
आमच्या आजीचा typical आवाज आला . कपाटातील तुपाची बरणी काढायचं 'एव्हडं सोप्पं' कामसुद्धा आजोबांना जमत नव्हतं .
"अगं आज्जी , आता तुझं वय आहे का आजोबांनी तुझ्याकडे बघायचं.. सारखं इकडं बघा इकडं बघा काय म्हणतीयेस !!"
"चल मेल्या । फाजील माणूस .. जा दादांना मदत कर "
तोपर्यंत दादांनी (आजोबांनी ) मुकाट्यानी तुपाची बरणी काढली होती . न काढून करतात काय बिचारे !!!
आज्जी आहेच तशी . काही तिच्या मनाविरुद्ध झालं , समोरचा कुणी चुकला कि मग ओरडा खाल्लाच म्हणून समजा . मग तो कुणीही असो . मुलगा असो, नातू असो, किवा अगदी साक्षात तिचे पतिदेव .
मला जरा गंमतच वाटते . लोक म्हणतात पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे गरीब, अबला etc etc असायची. तिला घरात काही स्थान नाही, सगळी कामं तिनी करायची . नवऱ्याची सेवा करायची . त्याला देव मानायचं . बर्याच प्रमाणात असेल सुद्धा तसं . पण १००% वाईट परिस्थिती पण नसणारे !!! बिचारे माझे आजोबा सगळी pension मुकाट आज्जीच्या हातात देत. सकाळी पाण्याची motor लावण्यापासून ते केर काढण्यापर्यंत सगळी कामं स्वतः करत . "स्त्री-पुरुष समानता मानली पाहिजे " etc सुविचार सांगायची गरज त्यांना कधी पडली नाही . उलट एखाद्या दिवशी "अगं, जरा ते lottery चं ticket काढायचं होतं . १० रुपयांचं " असं पैसे मागताना त्यांचा पडलेला चेहरा ज्यानी कुणी पाहिला असेल , तो माणूस तरी कधी आधीच्या पिढ्यांनी स्त्रियांवर अन्याय केले असं म्हणणार नाही .
परवा ती documentary पाहिली . "women are like flowers man is like thorn" etc etc … तो वकील काय काय बरळत होता . १ मिनिट वाटलं, चायला इतकं वाईट आहे का आपलं culture.. पण मग घरात काही अडी -अडचण असताना हिंमत करून 'उभी ठाकणारी' माझी आज्जी आठवली . तिची आई तर म्हणे तिच्यापेक्षा terror होती .. :) यांना नाही गरज लागली कुणी 'protect' करायची. यांना नाही कधी 'बाई' आहेस म्हणून कुणी गप्पं बसवलं .
याचा अर्थ काही problem नाहीच आहे,सगळं छान चालू आहे असं तर अजिबात नाही. mentality मध्ये प्रचंड बदल व्हायला हवाय. पूर्वी परिस्थिती वेगळी होती हे देखील खरं आहे . पण कुणीतरी दळभद्री माणूस बलात्कार करतो आणि तिचं वागणं आपल्या संस्कृती मध्ये बसत नाही म्हणून केलं वगैरे असं justify करायला जातो तेव्हा मात्रं डोकं फिरतं. बाहेरच्या लोकांनी Indian Culture म्हणून त्याचं वागणं generalize केल्यावर भयानक वाईट देखील वाटत.
"अरे मुडदा बशिवला तुझा" असं म्हणून त्या नराधमाला जरब बसवणारी कुणीतरी strong woman पाहिजे होती यार. हिंमतच नसती झाली. !!!!!!!!

Judiciary should set examples of harshest of punishments!
उत्तर द्याहटवाThen these demons will think before doing such heinous acts.... But donno kadhi honar tasa....