मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

6. Extra Mayonnaise

"Sir, You have extra mayonnaise?"
"Haha. Dumbass.  Would you like to have extra mayonnaise?"
"Sorry Sir. Would you like to have extra mayonnaise?""
"Ya.. Also put some extra olives"
"Anything else Sir?"
"Make it a meal"
"Yes Sir. Sir, Coke or Thumbs Up?"
"Coke.. make it diet"
"Yes Sir"

"Hey this is cold. I told you to make my bread hot."
"No Sir. You only said to put cheese."
"So you put cheese without heating buns?"
".."
"Call your manager. I want to tell him. See I always come here. Everyone knows that I take warm bread. How many times should I tell you people? "
"What happened Sir?"
"Hey.. You. You are the in-charge here right?"
"Yes Sir, please tell me what is the problem?"
"You gave me the cold bread again. Which bread do I take every time?"
"Sir.."
"No no. Which bread do I take every time?"
"You take warm bread from the oven Sir."
"Then?"
"I will arrange another one for you. Madhav is our new employee. I think he doesn't know."
"He doesn't even know how to speak in english. Why you keep such people?"
"Sorry Sir. I apologize for Madhav's mistake. Please enjoy your sub."

आज सकाळी लवकरच आला होता माधव. लवकर आला की overtime मिळतो.
पण आज मात्र.. काहीच बरोबर होत नाहीये.  allowance पण जाणार बहुतेक.
नवीन नोकरी.. कसं होणारे कुणास ठाऊक..
माधव नी एप्रन ची घडी केली .
तायडीला याच रंगाचा फ्रॉक हवाय. इतक्यात तर नाहीच शक्य! दिवाळीला बघू आता.
बारक्याच्या शाळेची फी..   च्च..  आजचा allowance गेलाच!

"Yes Sir. Would you like to have extra mayonnaise?"



शनिवार, २५ जुलै, २०१५

5. ती आई होती म्हणूनी..


 "ए ,  मला नाही हां ते टच-बीच कळत.. आणि मुळात गरजच काय मला नवीन phone ची ?"
"असं कसं आई , पन्नासावा वाढदिवस आहे.. आणि त्यात तुझा phone चा डब्बा झालाय "
"काही डब्बा नाही.. चांगला चालतोय. पडला तरी काही नाही होत त्याला "
"अग technology किती बदलली आई.. आजकाल कुणीतरी वापरत का ते बटण वाले phone ?"

आईनी नवीन phone वापरावा यासाठी माझे अथक प्रयत्न चालू, पण सगळं व्यर्थ. " बाबा असं चालत नाही अहो. तुम्ही तरी सांगा. बदलत्या technology सोबत आपण पण बदललं पाहिजे. तुम्ही तरी काही बोला तिला." तावातावानी मी बोलत होतो. जणू काही smartphone खपवण्याच target होतं माझ्यापुढे. गोल गोल बटण फिरवायच्या dial पासून ते touch screens पर्यंत कित्ती पुढे आली "आपली" technology. आणि आमच्या घरचे बघा. फार वाईट वाटत होतं मला. Engineer मुलगा आणि आईला साधा smartphone वापरता येत नाही म्हणजे काय? मी एकदम personally च घेतलं हे सगळं!!..  आणि शेवटी एकदाचा तो phone घरी आला. Full  accomplished झाल्यासारखा वाटत होतं मला. आपण कुणाच्या मागं राहायला नको.

जेंव्हा पहिल्यांदा mobiles आले तेंव्हाची गोष्टं. SMS कसा करायचा हे शिकवायला मला ३ महिने गेले. आणि त्यात पण प्रचंड गोंधळ,चीड चीड..
"आगं आई , असा message मिळाला की "milala" असा परत SMS करायचा नसतो . वाटेत कुठं गायब होत नाही तो SMS. आणि शिवाय तुला मिळाला हे मला आपोआप कळत असतं . त्यासाठी SMS कशाला वाया घालवायचा !!" मी म्हणजे अगदीच आगाऊ पणे आक्कल काढत होतो.

पण परवा मात्र shock झालो. WhatsApp ping आला.. कुठल्यातरी group वर timepass चालू असेल असं वाटून ignore केलं तर परत vibrate. फोन उघडून बघतो तर चक्क आईचा WhatsApp ping ..
"जेवण झाले का?"-आई

मग मात्र हसूच आलं.  Technology प्रमाणे बदललं पाहिजे हे खरच .. पण technology तरी काय काय बदलेल? आई ती आईच .. landline असो, email असो, WhatsApp ping असो नाईतर उद्या आणि काही..
"जेवण झाले का?"-आई

:)


ref :ती आई होती म्हणूनी.. (ती गेली तेंव्हा रिमझिम - कवी ग्रेस)



शनिवार, ७ मार्च, २०१५

4. Strong woman

"इकडं  बघा .  इकडं .. कुठं  म्हणतीये मी? आहो ..  बघा तर मी कुठ सांगतीये ते !!!!!! "
आमच्या  आजीचा typical  आवाज आला .  कपाटातील तुपाची बरणी काढायचं 'एव्हडं सोप्पं' कामसुद्धा आजोबांना जमत नव्हतं . 
"अगं आज्जी , आता तुझं  वय आहे का आजोबांनी तुझ्याकडे बघायचं..  सारखं  इकडं  बघा इकडं  बघा काय म्हणतीयेस !!"
"चल  मेल्या । फाजील माणूस ..  जा दादांना मदत कर "
तोपर्यंत दादांनी (आजोबांनी ) मुकाट्यानी तुपाची बरणी काढली होती . न काढून करतात काय बिचारे !!!

आज्जी आहेच तशी . काही तिच्या मनाविरुद्ध झालं , समोरचा कुणी चुकला  कि मग ओरडा खाल्लाच म्हणून समजा . मग तो कुणीही असो . मुलगा असो, नातू असो, किवा अगदी साक्षात तिचे पतिदेव . 

मला जरा  गंमतच वाटते . लोक म्हणतात पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे गरीब, अबला etc etc असायची. तिला घरात काही स्थान नाही, सगळी कामं तिनी करायची . नवऱ्याची  सेवा करायची . त्याला देव मानायचं . बर्याच प्रमाणात असेल सुद्धा तसं . पण १००% वाईट परिस्थिती  पण नसणारे !!! बिचारे माझे आजोबा सगळी pension मुकाट आज्जीच्या हातात देत. सकाळी पाण्याची motor लावण्यापासून ते केर काढण्यापर्यंत सगळी कामं स्वतः करत . "स्त्री-पुरुष समानता मानली पाहिजे " etc  सुविचार सांगायची गरज त्यांना कधी पडली नाही . उलट एखाद्या दिवशी "अगं, जरा ते lottery चं ticket काढायचं होतं . १० रुपयांचं " असं पैसे मागताना त्यांचा पडलेला चेहरा ज्यानी कुणी पाहिला असेल , तो माणूस तरी कधी आधीच्या पिढ्यांनी स्त्रियांवर अन्याय केले असं  म्हणणार नाही . 

परवा ती documentary पाहिली . "women are like flowers man is like thorn" etc etc … तो वकील काय काय बरळत होता . १ मिनिट वाटलं, चायला इतकं वाईट आहे का आपलं culture.. पण मग घरात काही अडी -अडचण असताना हिंमत करून 'उभी ठाकणारी' माझी आज्जी आठवली . तिची  आई तर म्हणे तिच्यापेक्षा terror होती .. :) यांना नाही गरज लागली कुणी 'protect' करायची. यांना नाही कधी 'बाई' आहेस म्हणून कुणी गप्पं बसवलं . 


याचा अर्थ काही problem नाहीच आहे,सगळं छान चालू आहे असं तर अजिबात नाही. mentality मध्ये प्रचंड बदल व्हायला हवाय. पूर्वी परिस्थिती वेगळी होती हे देखील खरं आहे . पण कुणीतरी दळभद्री माणूस बलात्कार करतो आणि तिचं वागणं आपल्या संस्कृती मध्ये बसत नाही म्हणून केलं वगैरे असं justify करायला जातो तेव्हा मात्रं डोकं फिरतं. बाहेरच्या लोकांनी Indian Culture  म्हणून त्याचं वागणं generalize केल्यावर भयानक वाईट देखील वाटत. 


"अरे मुडदा बशिवला तुझा" असं म्हणून त्या नराधमाला जरब बसवणारी कुणीतरी strong woman पाहिजे होती यार. हिंमतच नसती झाली.  !!!!!!!!