सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

2. चंगो



कविता म्हणजे पद्य! आणि  पुलं म्हणतात तसं, "जे गद्य  नाही ते पद्य!" असलीच काय ते कवितेची ओळख . काहीतरी danger अर्थ निघतो, तो बऱ्याचदा  4-5 वेळा वाचल्याशिवाय कळत  नाही.. आणि कळायला साहित्य etc  वाचायला लागतं असं  शाळेत बाई सांगायच्या. आणि त्याहून actual  reason  म्हणजे कधी ती 5-10  कडवी असणारी कविता समजायचा patience  च नव्हता बहुधा! पण हे सगळं  साधारण 1 महिन्यापूर्वी बदललं .. आणि ते पण एका facebook page मुळे !

चंगो हा माणूस अफलातून आहे. " आरे 4 line  ची poem असते  " एक मित्र  म्हणाला .. "U mean stanza?"…  नाही  फक्त stanza  च आसतो ..  म्हणजे 1 stanza ची 1 poem  असते..
काहीपण .. असं  कसं ? जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वाटलं .. 

ओंजळभर मागितलं तर
ओंजळभर मिळतं …
पण आपली ओंजळ भरली 
हे कितीजणाना कळतं?

चार lines  मध्ये काय काय सांगून टाकलं ..तुमचे विचार  मनापासून  असतील तरच तुम्ही ते थोडक्यात  सांगू शकता म्हणतात .. किती सच्चे, genuine thoughts आहेत हे... 

प्रत्येक  गावाबाहेर 
छोटा महारवाडा आहे 
चवथीच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे..

  गंभीर असं, realistic  असं काहीतरी ...  आपल्या समाजाच जळजळीत वास्तव .. पण तीच सांगायची  simplicity!! अक्षरशः आवाक  झालो..   इथं साधा email लिहताना 4 वेळा खाडाखोड होते, असा लिहू का तसा लिहू, हे वाचून असं  तर वाटणार नाही ना  ..   misunderstanding   तर होणार नाही ना etc  etc ..  त्या दिवसापासून मात्र  मग वेडंच  लागलंय ..  रोज चंगो  म्हणजेच  जेष्ठ कवी चंद्रशेखर गोखले ह्यांच्या facebook  page  वर काय कविता येतीये ते बघायची..  त्यांचं "मी माझा" पण वाचून काढलं ...

एकदा वाटलं स्पष्टच सांगावं
मग म्हंटलं कागदावर लिहावं 
मग म्हंटलं जाऊदे... 
तिचंतिला कळतयका ते पाहवं..
  
 haha..!!! चंद्रशेखर गोखले Sir,  माझ्या सारख्या खूप मुलांना तुम्ही कविता enjoy  पण करायची असते हे शिकवलंय .. त्यासाठी आयुष्यभर ऋणी..