शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

1. कणीस !!!



"कितीला?" बस मधून उतरताच एकानं विचारलं... भरभरून पडणाऱ्या मुंबईच्या पावसात, बस स्टॉप शेजारीच गरमागरम कणीस !
मी एकटाच नव्हतो, लाइन लावून लोक उभे होते.  Ultimate goal is to have satisfied customer.. sustainable sign of growth in your business.. थंडगार AC  मधे entrepreneurship and business development वगैरे talks ऐकताना खूप छान वाटत असत खर म्हणजे.. आणि इथ मात्र गरमागरम कणीस. "दादा, जरा गडबड आहे बरं का आज", तो म्हणाला. "ठीक आहे रे !!".. मला तसही काही काम नव्हतं . त्याची गडबड बघून मजा वाटत होती पण. कधी बरं आला होता हा?.. महिनाच झाला असेल.. किंवा तो ही नाही कदाचित.  "दादा, direct गावाकडून माल आणणार मी. उद्याच वरती छप्पर टाकून घेतो आणि खुर्च्या पण लावतो दोन." उत्साही होता.. मी पहिल्यांदाच पाहत होतो तिथं त्याला. तरीपण काय काय सांगत होता. जाताना विचारला, जातील नाहो कणसं , ही कालेजातली पोरं  कणीस खातात ना आजकाल?... जाणार रे.. नक्की...

आणि आज, १०-१२ लोक उभे, कणसं-शेंगा काय काय ठेवायला लागला हा.. "तू तर काय मोठा माणूस झालास रे".. हसला.  का लाजला? कुणास ठाऊक !! निघालो तर म्हणे, "दादा, हे febook काय असता?".. हादरलोच मी.." लोक कणीस खाताना फोटो काढतात इथ आणि देतात तिकडे. मग खूप लोकांना कळता. तुम्हाला माहितेये का? असेल तर जरा टाका की.. खूप लोक येतील मग.. नाहीतर एक काम करा मलाच सांगा कसा चालू करायचा.. ह्या फोन वर पण फोटो निघतात. मीच देतो मग तिकडे." Use of information and communication technology in business development etc etc..  किती मोठी मोठी नावं शब्दांना..
management वाला पीटर ड्रकर एकदा म्हणाला होता, Entrepreneurship is neither a science nor an art. It is a practice.... 
पुढच्या वेळी तश्या कुठल्या talk ला जाण्या पेक्षा सरळ कणीस खायला जायचा ठरवला आहे... :)

P.S.: btw fb वर फोटो टाकलाय, 'हॅविंग कणीस in rain .. feeling amazing'.. खूप likes मिळाले आहेत!!!