शनिवार, २० डिसेंबर, २०१४

३. उबर !!

"Sir ji  highway  से लिया तो चलेगा  ?"

"कहा से भी चलो यार,"


"नही  जी, वो  machine  record  कर लेता हे , फिर customer  complaint  भी कर सकता हे. तो company हमारा  पैसा  काट  लेती हे"


"अच्छा ok ..  कब से चला रहे  हो ?"


"मै  जी, छे महिने तो हो गये."


"तुम्हे  phone  आता हे क्या?"


"हांजी, कंपनी call  करती हे । Phone भी उन्होनेही दिया हे "


"गाडी भी उनकी हे या तुम्हारी?"   (माझ्या चौकश्या सुरुच.. )


"नही  जी, गाडी तो मेरी हे। उन्होने सिर्फ उनका sticker लगाया .. देखिये Sir  ji  पैसा भी क्या क्या करता हे. नया गाडी लिया था, पीछे  बिवी का नाम लिखाया था..  वो भी खुश थी..  मगर ४ दिन  में कंपनी के साथ service  start किया..  तो बोलते हे, नाम निकालो वरना  contract नही देंगे.. तो  निकालना पडा ..  "


"पैसा अच्छा  हे क्या ?" (आगाउपणा !!!)


"वो तो हे जी । पैसा बहुत अच्छा  हे ..  हर हफ्ते का १५ हजार मिलता  हे । गाडी का हफ्ता वगैर निकालके  के भी २०-२५ तो मिल हि जाता हे "


"सही हे यार.. "


"हान  जी..  भगवान कि दया..  ये आप लोग की  internet  वाली company  पैसा अच्छा  देती हे..  बाकी भी कोइ  tension  नही..  पेहले खुद से  चलाता  था  तो मुश्किल  से १० -११ कमा  लेता था.. "


"उस से तो ये काफी  हे.. "


"सर जी , इतना तो होना  हे ना, महेंगाई  कितनी हे.. अभी लडकी को सीखाना भी  हे..  उसको अंग्रेझी  school मी डाला  हे..  "


परवा बातमी वाचली की rape case  मुळे online  taxi  बंद होणार. आणि मग परत आठवला तो.  

प्रत्येक वाक्याला अदबीनं जी  जी म्हणणारा  तो driver  मस्त होतां. मुलगी इंग्लिश medium ला शिकते हे कसला अभिमानाने सांगत होता.  आणि मग  मात्र विचित्र वाटलं.

Taxi  बंद  करून rape  कसे कमी होणार ?? काय माहीत..
नव्या गाडीचा हफ्ता तो आता कसा भरणार ??  काय माहीत..
आणि त्याच्या मुलीची शाळा तर सुरु राहील ना ?? खरंच काय माहीत..

उबर !!







सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

2. चंगो



कविता म्हणजे पद्य! आणि  पुलं म्हणतात तसं, "जे गद्य  नाही ते पद्य!" असलीच काय ते कवितेची ओळख . काहीतरी danger अर्थ निघतो, तो बऱ्याचदा  4-5 वेळा वाचल्याशिवाय कळत  नाही.. आणि कळायला साहित्य etc  वाचायला लागतं असं  शाळेत बाई सांगायच्या. आणि त्याहून actual  reason  म्हणजे कधी ती 5-10  कडवी असणारी कविता समजायचा patience  च नव्हता बहुधा! पण हे सगळं  साधारण 1 महिन्यापूर्वी बदललं .. आणि ते पण एका facebook page मुळे !

चंगो हा माणूस अफलातून आहे. " आरे 4 line  ची poem असते  " एक मित्र  म्हणाला .. "U mean stanza?"…  नाही  फक्त stanza  च आसतो ..  म्हणजे 1 stanza ची 1 poem  असते..
काहीपण .. असं  कसं ? जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वाटलं .. 

ओंजळभर मागितलं तर
ओंजळभर मिळतं …
पण आपली ओंजळ भरली 
हे कितीजणाना कळतं?

चार lines  मध्ये काय काय सांगून टाकलं ..तुमचे विचार  मनापासून  असतील तरच तुम्ही ते थोडक्यात  सांगू शकता म्हणतात .. किती सच्चे, genuine thoughts आहेत हे... 

प्रत्येक  गावाबाहेर 
छोटा महारवाडा आहे 
चवथीच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे..

  गंभीर असं, realistic  असं काहीतरी ...  आपल्या समाजाच जळजळीत वास्तव .. पण तीच सांगायची  simplicity!! अक्षरशः आवाक  झालो..   इथं साधा email लिहताना 4 वेळा खाडाखोड होते, असा लिहू का तसा लिहू, हे वाचून असं  तर वाटणार नाही ना  ..   misunderstanding   तर होणार नाही ना etc  etc ..  त्या दिवसापासून मात्र  मग वेडंच  लागलंय ..  रोज चंगो  म्हणजेच  जेष्ठ कवी चंद्रशेखर गोखले ह्यांच्या facebook  page  वर काय कविता येतीये ते बघायची..  त्यांचं "मी माझा" पण वाचून काढलं ...

एकदा वाटलं स्पष्टच सांगावं
मग म्हंटलं कागदावर लिहावं 
मग म्हंटलं जाऊदे... 
तिचंतिला कळतयका ते पाहवं..
  
 haha..!!! चंद्रशेखर गोखले Sir,  माझ्या सारख्या खूप मुलांना तुम्ही कविता enjoy  पण करायची असते हे शिकवलंय .. त्यासाठी आयुष्यभर ऋणी.. 


 



शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

1. कणीस !!!



"कितीला?" बस मधून उतरताच एकानं विचारलं... भरभरून पडणाऱ्या मुंबईच्या पावसात, बस स्टॉप शेजारीच गरमागरम कणीस !
मी एकटाच नव्हतो, लाइन लावून लोक उभे होते.  Ultimate goal is to have satisfied customer.. sustainable sign of growth in your business.. थंडगार AC  मधे entrepreneurship and business development वगैरे talks ऐकताना खूप छान वाटत असत खर म्हणजे.. आणि इथ मात्र गरमागरम कणीस. "दादा, जरा गडबड आहे बरं का आज", तो म्हणाला. "ठीक आहे रे !!".. मला तसही काही काम नव्हतं . त्याची गडबड बघून मजा वाटत होती पण. कधी बरं आला होता हा?.. महिनाच झाला असेल.. किंवा तो ही नाही कदाचित.  "दादा, direct गावाकडून माल आणणार मी. उद्याच वरती छप्पर टाकून घेतो आणि खुर्च्या पण लावतो दोन." उत्साही होता.. मी पहिल्यांदाच पाहत होतो तिथं त्याला. तरीपण काय काय सांगत होता. जाताना विचारला, जातील नाहो कणसं , ही कालेजातली पोरं  कणीस खातात ना आजकाल?... जाणार रे.. नक्की...

आणि आज, १०-१२ लोक उभे, कणसं-शेंगा काय काय ठेवायला लागला हा.. "तू तर काय मोठा माणूस झालास रे".. हसला.  का लाजला? कुणास ठाऊक !! निघालो तर म्हणे, "दादा, हे febook काय असता?".. हादरलोच मी.." लोक कणीस खाताना फोटो काढतात इथ आणि देतात तिकडे. मग खूप लोकांना कळता. तुम्हाला माहितेये का? असेल तर जरा टाका की.. खूप लोक येतील मग.. नाहीतर एक काम करा मलाच सांगा कसा चालू करायचा.. ह्या फोन वर पण फोटो निघतात. मीच देतो मग तिकडे." Use of information and communication technology in business development etc etc..  किती मोठी मोठी नावं शब्दांना..
management वाला पीटर ड्रकर एकदा म्हणाला होता, Entrepreneurship is neither a science nor an art. It is a practice.... 
पुढच्या वेळी तश्या कुठल्या talk ला जाण्या पेक्षा सरळ कणीस खायला जायचा ठरवला आहे... :)

P.S.: btw fb वर फोटो टाकलाय, 'हॅविंग कणीस in rain .. feeling amazing'.. खूप likes मिळाले आहेत!!!